दक्षिण कोरियाच्या पंतप्रधानांविरोधातील महाभियोग फेटाळला

दक्षिण कोरियाचे पंतप्रधान हान डक सू यांच्याविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव न्यायालायने फेटाळला असून आता ते पूर्वीप्रमाणे देशाची हंगामी अध्यक्ष म्हणून कायम राहू शकणार आहेत. घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत 7 विरुद्ध 1 अशा फरकाने हान डक सू यांच्यावरील आरोप त्यांना हटवण्यासाठी पुरेसे नसल्याचे स्पष्ट करून महाभियोग फेटाळण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर हान डक सू यांनी समाधान व्यक्त केले आणि तातडीच्या विषयांना हाताळण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.