दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-येओल यांनी देशात मार्शल लॉ जाहीर केला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे, यून सुक-येओल म्हणाले आहेत. राष्ट्राला संबोधित करताना योले म्हणाले की, उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट शक्तींपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे.
देशद्रोही घटकांचा नायनाट करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे यून सुक-येओल यांनी सांगितले. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे ते म्हणाले. मात्र हा मार्शल लॉ किती काळ लागू राहील, हे राष्ट्रपतींनी सांगितले नाही.
मार्शल लॉ कधी लागू होतो?
आणीबाणीची स्थिती असताना मार्शल लॉ लागू केला जातो. अशा स्थितीत विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पक्षाने मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या मीडियानुसार, लष्कराने सर्व संसदीय कामकाज स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी मार्शल लॉ हटवण्याची मागणी केली
दक्षिण कोरियातील प्रमुख विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पक्षाने मार्शल लॉ हटवण्याची मागणी केली आहे. विरोधकांनी सर्व खासदारांना नॅशनल असेंब्लीमध्ये एकत्र येण्यास सांगितले आहे. विरोधी पक्षनेते ली जे म्युंग यांनीही देशातील जनतेला नॅशनल असेंब्लीमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
मार्शल लॉ काय आहे?
मार्शल लॉ ही कोणत्याही देशात सरकारने घोषित केलेली न्यायव्यवस्था आहे. ज्यामध्ये लष्करी दलांना एखाद्या क्षेत्रावर नियंत्रित करण्याचा अधिकार दिला जातो.