लँडिंग करताना विमान थेट भिंतीवर जाऊन धडकले, भीषण स्फोटात 179 प्रवाशांचा मृत्यू

दक्षिण कोरियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी 175 प्रवासी आणि सहा क्रू सदस्य असलेले विमान धावपट्टीवरून घसरले आणि धावपट्टीजवळ असलेल्या भिंतीला जाऊन धडकले. या धडकेनंतर विमानाचा स्फोट झाला असून यात विमानातील 179 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजेत. या भीषण दुर्घटनेतून दोन प्रवासी चमत्कारिकरित्या बचावले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर रविवारी हा विमान अपघात झाला. जेजू एअरच्या विमानाला आग लागली. हे विमान थायलंडहून परतत होते. लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला. स्थानिक मीडियाने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये विमान जळताना दिसत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे. मुआन विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.