अफगाणिस्तान व आयर्लंड दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेने तयारी सुरू केली आहे. मोठ्या एकदिवसीय स्पर्धेपूर्वी आफ्रिकन मंडळाने आपल्या नियमित खेळाडूंना विश्रांती देत काही नवीन खेळाडूंना आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अफगाणिस्तान आणि आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने पॅगिसो रबाडा, केशव महाराज, एन्रीक नॉर्पिया, मार्को यानसेन, तबरेझ शम्सी, जिराल्ड कोएत्झी, डेव्हिड मिलर आणि हेन्रीक क्लासन यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाही, तर अष्टपैलू जेसन स्मिथ, नाकाबायोमझी पीटर आणि अँडेल सिमलेन या युवा खेळाडूंचा संधी दिली आहे. आगामी या मालिकेत दक्षिण आफ्रिकन संघ 20 दिवसांत 6 वन डेसह 8 सामने खेळणार आहे. यात टी-20 सामन्यांचाही समावेश आहे. येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर ते अबुधाबी येथे 27 आणि 29 तारखेला आयर्लंडविरुद्ध 2 टी-20 आणि 2 ते 7 ऑक्टोबरदरम्यान तीन वन डे सामने खेळणार आहेत.