दक्षिण आफ्रिकेची विजयाची सत्ता

फॉलोऑनच्या नामुष्कीनंतर कर्णधार शान मसुदच्या 145 धावांच्या झुंजार खेळामुळे पाकिस्तानने दुसऱ्या डावात 478 धावांपर्यंत मजल मारली, पण ते दक्षिण आफ्रिकेसमोर 58 धावांचेच छोटेसे लक्ष्य उभारू शकले. यजमानांच्या डेव्हिड बेडिंगहम (47) आणि एडन मार्करम (14) यांनी आठव्या षटकातच विजयी लक्ष्य गाठत मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवले. तसेच कसोटीत सलग सातव्या विजयाची नोंद केली. गेल्या वर्षी त्यांनी वेस्ट इंडीजचा विरुद्ध एक आणि बांगलादेश, श्रीलंका आणि आता पाकिस्तान या आशियाई संघाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा विजयाची नोंद करत अनोखी हॅट्ट्रिक साजरी केली. तसेच हा त्यांचा सलग चौथा मालिका विजयही आहे. 259 धावा करणारा रायन रिकल्टन सामनावीर तर मालिकेत 10 विकेट घेणारा मार्को यान्सन मालिकावीर ठरला.