हिंदुस्थानात गर्दीचा अर्थ गुणवत्ता होत नाही, अभिनेता सिद्धार्थने साधला अल्लू अर्जुवर निशाणा

अल्लू अर्जुनचा सिनेमा ‘पुष्पा 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करत आहेत. अॅक्शन आणि ड्रामा असलेल्या या सिनेमाने जगभरात आतापर्यमत 900 कोटींची कमाई केली आहे. पुष्पा 2 हिट ठरत असतानाच साऊथ अभिनेता सिद्धार्थने अल्लू अर्जुनवर निशाणा साधला आहे. सिद्धार्थने पुष्पा 2 च्या ट्रेलरला जमलेल्या गर्दीची जेसीबी पहायला जमणाऱ्या गर्दीशी तुलना केली आहे. गर्दीचा अर्थ गुणवत्ता होत नाही असे सिद्धार्थने म्हटले आहे.

पुष्पा 2 चा बिहारमध्ये ट्रेलर लाँच करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनच्या लाखो फॅन्सनी हजेरी लावली होती. यावरून सिद्धार्थने अल्लू अर्जुनवर टीका केली.

काय म्हणाला सिद्धार्थ?

“आपल्या देशात जेसीबीचे खोदकाम पहायलाही गर्दी जमते. मग बिहारमध्ये अल्लू अर्जुनला पहायला लोक जमा होणे असामान्य बाब नाही. जर त्यांनी आयोजित केली तर गर्दी नक्कीच होईल. हिंदुस्थानात गर्दीचा अर्थ गुणवत्ता होत नाही. जर असे असते तर सर्व राजकीय पक्ष निवडणूक जिंकले असते. मग लोकांना बिर्याणीची पाकिटे आणि दारुच्या बाटल्या वाटण्याची गरज पडली नसती”, असे सिद्धार्थ म्हणाला.

सिद्धार्थचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याच्या या कमेंटमुळे अल्लू अर्जुनचे फॅन्स नाराज झाले आहेत. त्यांनी सिद्धार्थवर जलस झाल्याचा आरोप केला आहे. तर काहींनी त्याला वाईट न बोलण्याचे आवाहन केले आहे.