चुकूनही गुगलवर ही लाईन सर्च करू नका, अन्यथा सर्वकाही होणार हॅक!

इंटरनेट युजर्सची फसवणूक करण्यासाठी सायबर चोर वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. अशातच एका अहवालानुसार, काही खास शब्द इंटरनेटवर सर्च केल्यावर सायबर चोर लोकांना हेरत आहेत. त्यानंतर लिंकवर क्लिक केल्यावर खासगी माहिती ऑनलाईन शेअर केली जाते. या प्रोग्राममुळे संगणकातील माहिती लिक होऊ शकते.

मीडिया वृत्तानुसार, सायबर सिक्युरीटी कंपनी SOPHOS कडून इशारा जारी करण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, लोकं गुगलवर Are Bengal Cats Legal in Australia? असे सर्च करत आहेत. त्यांचा खासगी डेटा ऑनलाईन पोस्ट होत आहे. असे सर्च केल्यानंतर मिळणाऱ्या पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर होत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 6 शब्द सर्च करणाऱ्या युजर्सच्या सायबर हल्ल्याचा शिकार होण्याचा धोका वाढला आहे.

SOPHOSच्या माहितीनुसार, ही लिंक किंवा अॅडवेअरवर क्लिक करण्यास भाग पाडले जाते. याप्रकरणी कायदेशीर गुगल सर्चवरून असे केले जात आहे. दिलेल्या इशाऱ्यानुसार असे वाटत आहे की, स्कॅमर खासकरून ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या अशा लोकांना लक्ष्य करत आहे.

SOPHOS ने सांगितले की, ज्यावेळी युजर्स सर्च रिझल्टवर क्लिक करतात तेव्हा त्यांची खासगी माहिती आणि बॅंक डिटेल्स एका प्रोग्रामच्या मदतीने ऑनलाईन शेअर केले जाते. SOPHOS ने हेही सांगितले की, ज्या लोकांनी हे सर्च केले, त्यांनी लवकरात लवकर आपला पासवर्ड बदलायला हवा, असेही SOPHOS ने म्हटले आहे.