सोनी बीबीसी अर्थवर ‘प्लॅनेट अर्थ 3’

सोनी बीबीसी अर्थने नवीन शो ‘प्लॅनेट अर्थ 3’च्या प्रीमियरची घोषणा केली आहे. आठ भागांची ही सीरिज जगातील सर्वात अद्भुत प्रजातींना आणि उत्तम कथांना दाखवते. नाटय़, रोमांच, हास्य आणि भावनांच्या माध्यमातून ही सीरिज उलगडत जाणार आहे. सर डेव्हिड अॅटेनबरो यांनी सादर केलेला हा कार्यक्रम 29 जुलै रोजी रात्री 9 वाजता सोनी बीबीसी अर्थवर प्रदर्शित झाला. सागवान जंगल, शिट्टीसारखा आवाज करणारे जंगली कुत्रे त्यांच्या तिप्पट आकाराच्या प्राण्यांची शिकार करतात. विषारी कोब्रा मानवासोबत राहतो. ज्यामुळे त्यांच्या वागणुकीत बदल होतो, अशा अनेक गोष्टी या सीरिजमधून उलगडण्यात येणार आहेत, अशी माहिती सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी आणि व्यवसायप्रमुख तुषार शाह यांनी दिली.