देशाच्या प्रगतीत आणि विकासात डॉ. मनमोहन सिंग यांचे अतुलनीय योगदान, सोनिया गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत सिंग यांना श्रद्धांजली वाहिली गेली. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. यावेशी काँग्रेसने सोशल मीडियावर सोनिया गांधी यांनी सिंग यांच्यासाठीचा शोक संदेश जारी केला.

आपल्या शोक संदेशमध्ये सोनिया गांधी म्हणाल्या की डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. सिंग हे माझे चांगले मित्र आणि मार्गदर्शक होते. सिंग हे विनम्र होते आणि त्यांचे विचार दृढ होते.

मनमोहन सिंग हे बुद्धी, शालीन आणि विनम्रतेचे प्रतीक होते. सिंग यांनी मनाने आणि बुद्धीने आपल्या देशाची सेवा केली. सिंग हे काँग्रेस पक्षासाठी उज्जवल आणि प्रिय मार्गदर्शक होते, त्यांच्य स्वभावात असलेली करुणा आणि दूरदर्शी स्वभावामुळे लाखो हिंदुस्थानींचे आयुष्य बदलले आणि त्यांना सशक्त केलं.

जगातील अनेक नेते आणि विद्वानांनी त्यांचा सन्मान आणि प्रशंसा केली. सिंग यांनी जी पदं भुषवली त्या पदाला त्यांनी साजेसे काम केले आणि देशाला सन्मान मिळवून दिला.

सिंग यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्ष आणि हिंदुस्थानच्या नागरिकांना नेहमीच गर्व राहिल आणि त्यांचा ऋणी राहिल. सिंग यांनी हिंदुस्थानच्या प्रगतीत आणि विकासात अतुलनीय योगदान दिले आहे असेही सोनिया गांधी म्हणाल्या.