शिक्षण व्यवस्थेतील तीन ‘C’ त्रासदायक; सोनिया गांधी यांची नवीन शिक्षण धोरणावर टीका

देशात पुन्हा एकदा नवीन शिक्षण धोरणाची चर्चा सुरू झाली आहे. सोनिया गांधी यांनी नवीन शिक्षण धोरणाविरोधात आवाज उठवला आहे. यासंदर्भात बोलताना त्यांनी नवे शिक्षण धोरण तरुणांच्या शिक्षणाबाबत उदासीन असल्याचा दावा केला आहे. त्या म्हणतात की तीन ‘ C’ – centralization, commercialization, and communalization (केंद्रीकरण, व्यापारीकरण आणि सांप्रदायिकरण) आज शिक्षण व्यवस्थेला त्रास देत आहेत. सोनिया गांधी यांनी सरकारच्या दृष्टिकोनावर टीका केली. शिक्षणाचे व्यापारीकरण आणि आउटसोर्सिंग, पाठ्यपुस्तकांचे सांप्रदायिकीकरण आणि हाय प्रोफाइल शिक्षण धोरण आणणे हे मुलांच्या शिक्षणाबाबत उदासीन सरकारच्या वास्तवावर पांघरूण घालण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.