सत्ताधाऱ्यांमुळे महात्मा गांधींचा वारसा धोक्यात, सोनिया गांधी यांची भाजपवर टीका

सत्ताधाऱ्यांमुळे महात्मा गांधींचा वारसा धोक्यात आला आहे अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. तसेच संघ आणि भाजपचा स्वातंत्र्य लढ्यात काहीच योगदान नव्हते असेही गांधी म्हणाल्या.

बेळगावात काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी या अधिवेशनाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. या अधिवेशनात त्यांचां संदेश वाचला गेला. सोनिया गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशू म्हणाल्या की, आजच्या सत्ताधारी पक्षामुळे महात्मा गांधी यांचा वारसा धोक्यात आला आहे. महात्मा गांधी यांनी एक पिढी घडवली. पण आता दिल्लीत बसलेल्या सत्ताधाऱ्यांमुळे महात्मा गांधीचा वारसा धोक्यात आला असून त्यांच्यामुळे महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणाऱ्या संस्थाही धोक्यात आल्या आहेत. या संघटनांनी कधी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नाही घेतला. त्यांनी महात्मा गांधींचा विरोध केला आणि एक विषारी वातावरण तयार केले, त्यामुळेच गांधींची हत्या झाली आणि आता हेच लोक महात्मा गांधींचा खून करण्याऱ्याचा उदो उदो करत आहेत. आपल्या संघटनेचा इतिहास गौरवपूर्ण आहे. पक्षासमोर येणाऱ्या आव्हानांना आपण धीराने सामोरं जाऊ असा निर्धारही गांधी यांनी व्यक्त केला.