सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

काँग्रेस नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याचे बातमी समोर येत आहे. त्यानंतर त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोटाच्या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं बोललं जात आहे. याबाबत माहिती देताना रुग्णालयाने सांगितले की, काळजी करण्यासारखे काही नाही. सोनिया गांधी यांना शुक्रवारी संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.

सर गंगाराम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितलं की, “पोटाच्या काही समस्येमुळे त्यांना आज दाखल करण्यात आलं आहे. उद्या सकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.” गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ डॉ. समीरन नंदी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.