सरत्या वर्षाला निरोप देत जगभरातील नागरिकांनी उत्साहात नववर्षाचे स्वागत केले. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकातासह मेट्रो सिटीतील नागरिकांनी पर्यटनस्थळी जात नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. सेलिब्रिटींनीही वेगवेगळे डेस्टीनेशनला भेट देत नववर्षाचा आनंद लुटला. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल यांनीही ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचे स्वागत केले. यावेळी तिने फटाक्यांच्या आतषबाजीचाही आनंद लुटला. मात्र यामुळे सोनाक्षीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
सोनाक्षी सिन्हा हिने 2023 मध्ये दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणावर पोस्ट केली होती. फटाके वाजवणाऱ्यांचा उल्लेख तिने मूर्ख असाही केला होता. मात्र आता सोनाक्षी तिच्या पतीसह ऑस्ट्रेलियात इंग्रजी नववर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदात स्वागत करताना दिसत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी तिची जुनी पोस्ट शेअर केली असून तिला फटकारले आहे.
Sonakshi on Diwali Vs Sonakshi on New Year pic.twitter.com/1fmCLKVNkd
— Rishi Bagree (@rishibagree) January 1, 2025
दरम्यान, अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे नववर्ष स्वागताचे फोटोही व्हायरल होत आहेत. आलिया आणि रणबीर कुटुंबीयांसह दिसत आहे. रणबीरच्या कडेवर छोटी राहाही दिसत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री कतरिना कैफ हिने समुद्रकिनारी नववर्षाचे स्वागत केले. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram