दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून, गंगापूर तालुक्यातील वजनापूर शिवारातील घटना

बापाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून मुलाने बापाला मारहाण करत खून केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील वजनापूर शिवारात शुक्रवार, 3 रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी उघडकीस आली. वजनापूर येथील रहिवासी शेषराव रंभाजी चव्हाण (80) असे मृताचे नाव आहे. नंदू शेषराव चव्हाण (50) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वजनापूर शिवारात शेत गट नं. 28 मध्ये शेषराव रंभाजी चव्हाण (80, रा. वजनापूर) गट नं. 28 मध्ये पती, पत्नी व मुलगी असे राहतात. त्यांची दोन्ही मुले, सुना व नातवंड हे रांजणगाव शेणपुंजी येथे राहतात. मुलगा नंदू शेषराव चव्हाण हा आई वडिलांकडे आला होता. आई व बहीण दोघीजणी नातेवाईकांकडे गेले होते. गुरुवार, २ रोजी सांयकाळी साडेपाच वाजता शेषराव रंभाजी चव्हाण (80) यांच्याकडे आरोपी नंदू शेषराव चव्हाण (50) यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने राग आल्याने चापट, बुक्क्याने व लोखंडी खुर्ची डोक्यात घालून ठार मारले. शेषराव चव्हाण यांचे इतर नातेवाईक घरी आल्यानंतर ही घटना शुक्रवार, 3 रोजी सकाळी 11.30 वाजता उघडकीस आली.

आजोबाचा खून बापानेच खून केल्याचे नातवाला समजताच त्यांनी शिल्लेगाव पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख, पोहे. काँ. श्रीकृष्ण दाणी, पो.काँ. हनुमंत सातपुते हे घटनास्थळी पोहोचले. आरोपी नंदू यास पोलीस आल्याचे समजताच त्याने शेतवस्तीवरून कपाशीच्या शेतात पळ काढला. नातेवाईकांनी आरडाओरडा केला असता पोकॉ. हनुमंत सातपुते यांनी आरोपीस पाठलाग करून पकडले. त्याची चौकशी केली असता त्यास दारूचे व्यसन असून, आई व बहीण हे व्यसनासाठी पैसे देत होते. परंतु, गुरुवार, २ रोजी बहीण व आई हे गावी नातेवाईकांकडे गेलेले असल्याने त्याने वडिलांस पैसे मागितले. त्यांनी नकार दिल्याने मारल्याचे सांगितले. आकाश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याचे वडील नामे नंदू शेषराव चव्हाण याच्याविरुध्द शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख, पो. हे. कॉ श्रीकृष्ण दाणी, पो.कॉ. हनुमंत सातपुते यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.