Somnath Suryawanshi Case – निलंबीत पोलीस अधिकारी अशोक घोरबांड एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात दिसले, नेटकरी भडकले

सोमनाथ सुर्यवंशी कोठडीतील मृत्यूप्रकरणी परभणीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबीत केले आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे, असे असतानाच घोरबांड यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्यासोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून नेटकरी भडकले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यूबद्दल जे खोटे सांगितले ते या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी तर नाही ना? असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे. तर काहींनी सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणी निलंबित करण्यात आलेले परभणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात काय करतायत असा सवाल देखील काहींनी केला आहे