
जम्मू आणि राजस्थान दरम्यान धावणाऱ्या सोमनाथ एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी पह्न आल्यानंतर ही ट्रेन सकाळी 7.42 वाजता कासू बेगू रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली होती. सर्व प्रवाशांना बाहेर काढून गाडीची बॉम्ब शोधक पथक आणि प्रशिक्षित श्वानांकरवी काटेकोर तपासणी करण्यात आली. मात्र पुठलीही घातक स्पह्टके आढळून आली नाहीत. सहा तासांच्या विलंबानंतर ही गाडी पुढे रवाना करण्यात आला. हा निनावी कॉल करणाऱ्या आरोपीला पश्चिम बंगाल पोलिसांनी दक्षिण 24 परगणा जिह्यात पकडले.