एलओसीजवळ भूसुरुंगाचा स्फोट; जवान जखमी

जम्मू-कश्मीरच्या पूंछ जिह्यात भूसुरुंगाच्या स्फोटात आज एक जवान जखमी झाला. नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालत असताना भूसुरुंगाचा स्पह्ट झाल्याने जवान जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कृष्णा घाटी सेक्टरच्या नांगी-टाकेरी भागात सकाळी 10.50 वाजता जवान गस्तीवर असताना हा स्फोट झाला. जवानाने चुकून भूसुरुंगावर पाऊल ठेवल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घुसखोरांना आळा घालण्यासाठी भूसुरुंग पेरले जातात, पण कधी कधी पावसामुळे ते वाहून जातात आणि अशा प्रकारचे अपघात होतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.