
इंजीनियर रेजिमेंट 110, अ.प्र. येथे कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात शहिद झालेले जवान सुनिल विठ्ठल गुजर (25) यांच्या पार्थिवावर आज सकाळी शाहुवाडी तालुक्यातील मौजे शित्तूर तर्फ मलकापूर या मुळ गावी, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरूणाचल प्रदेशात चीन सीमेलगत रस्ता बनविण्याचे काम करत असताना, 13 मार्च रोजी त्यांचे वाहन खोल दरीत कोसळले होते. या अपघातात त्यांना वीरमरण आले. या बातमीने संपूर्ण शाहुवाडी तालुक्यावर शोककळा पसरली. काल सायंकाळी पुण्यातुन आज सकाळी कोल्हापूरात त्यांचे पार्थिव दाखल झाल्यानंतर लष्करी वाहनातून, त्यांच्या मुळ गावी दाखल झाले. यावेळी बांबवडे बाजारपेठेसह परिसरातील गावांत बंद ठेऊन आंदराजली वाहली. जवान गुजर यांच्या अत्यंदर्शनासाठी बांबवडेपासून त्यांच्या गावापर्यंत दोन्ही बाजूने नागरिकांनी गर्दी केली होती.