दिग्दर्शक साजीद खान याने अखेर मी टूच्या आरोपावर आपली बाजू पुन्हा एकदा मांडली आहे. 2018 साली साजीद खानवर मी टू अंतर्गत महिलांनी शोषण केल्याचे आरोप केले होते. या आरोपानंतर आपल्याला काम मिळणे अवघड झाले आहे. कमाई नसल्याने मला माझे घर विकावे लागले. त्या आंदोलनात नाव आलेले सर्व जण काही ना काही काम करत आहेत. फक्त मलाच काम मिळालेले नाही. याचे जास्त वाईट वाटते. त्यामुळे मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो, असे साजीद खान एका मुलाखतीत म्हणाला.