Solar eclipse – 2025 मधील पहिलं सूर्यग्रहण 29 मार्चला, इथे राहील चार तास अंधार!

2025 हे वर्ष खगोल प्रेमींसाठी अधिक खास असणार आहे. या वर्षात दोन सूर्यग्रहण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पहिलं सूर्यग्रहण हे 29 मार्च रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण अंशिक असेल. जे यूरोप, उत्तर अफ्रिका, आणि उत्तर ध्रुवाच्या काही भागात दिसण्यची शक्यता आहे. कारण चंद्राची छाया पृथ्वीच्या दक्षिणेकडून जाणार आहे. या खगोलीय घटनेमुळे युरोपचा काही भाग आणि उत्तर ध्रुव चार तासांसाठी अंधारात बुडेल. टाईम अँड डेटा वेबसाइटनुसार, 814 दशलक्ष लोक आंशिक सूर्यग्रहण पाहू शकतील.

तसेच दुसरे 21 सप्टेंबर रोजी अंशिक सूर्यग्रहण देखील होईल जे जगाच्या विविध भागातून दिसेल. हे सूर्यग्रहण जरी पूर्ण होणार नसले तरी हे ग्रहण सुमारे चार तास चालेल. हे ग्रहण सकाळी 7:50 वाजता (पॅरिस वेळेनुसार) सुरू होईल. त्याचा जास्तीत जास्त परिणाम सकाळी 11:47 पर्यंत राहील आणि तो दुपारी 1:43 च्या सुमारास संपेल. जे लोक ग्रहणाच्या मध्य रेषेच्या जवळ आहेत त्यांना सूर्याचा मोठा भाग झाकलेला दिसेल.

हे ग्रहण पाहण्यासाठी स्वच्छ हवामान खूप महत्वाचे असेल. म्हणून, कमी ढग असलेल्या जागा निवडा. जास्त उंचीवरून जिथे हवामान स्थिर राहते अशा ठिकाणांहून ग्रहण चांगले दिसते. त्याच वेळी, सुरक्षित डोळ्यांची उपकरणे वापरा. कोणत्याही संरक्षणात्मक उपायांशिवाय थेट सूर्याकडे पाहू नका. विशेष म्हणजे सौर चष्मा किंवा दुर्बिणी वापरा.