Solapur News – कुंभारी टोल नाक्याजवळ एसटी बसने घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवासी सुखरुप

सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कुंभारी टोल नाक्याजवळ एसटी बसने अचानक पेट घेतलल्याची घटना घडली आहे. चालक प्रशांत पांचाळ यांच्या सदर प्रकार लक्षात येताच यांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यामुळे मोठी जीवतहानी टळली. मात्र, एसटी जळून खाक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाणगापूरहून कुर्डवाडीच्या दिशेने बस जात होती. एसटीमध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते. याच दरम्यान बस सोलापूर-अक्कलकोट मार्गावरील कुंभारी टोलनाक्या जवळ आली असता एसटीने अचानक पेट घेतला. सदर प्रकार चालक प्रशांत पांचाळ यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ आरडाओरडा करत सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. प्रशांत पांचाळ यांच्या तत्परतेमुळे 40 प्रवशांचे प्राण वाचले आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु एसटी बस जळून खाक झाली आहे.