प्रबोधन गोरेगाव संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित यंदाची ‘समाजसेवक उद्योगपती नीळकंठ ऊर्फ भाईसाहेब सावंत स्मृती’ मराठी कथाकथन स्पर्धा 22 व 23 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. प्रबोधन क्रीडा भवन, सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम येथे ही स्पर्धा पार पडेल. मुंबई (शहर व उपनगरे), ठाणे, पालघर आणि रायगड या जिह्यांतील 35 ते 65 वर्षे वयोगटातील सर्वांसाठी स्पर्धा खुली आहे.
विजेत्यांना प्रथम क्रमांकास 11 हजार, द्वितीय क्रमांकास 7 हजार व तृतीय क्रमांकास 5 हजार रुपये आणि प्रत्येकी 1 हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके, स्मृतिचिन्ह दिले जाईल. पहिल्या तीन पारितोषिक विजेत्यांपैकी ज्यांची स्वलिखित विनोदी कथा असेल त्यांना 3 हजार रुपयांचे स्वतंत्र विशेष काwशल्य पारितोषिक दिले जाईल. कथा स्वलिखित, अन्य लेखकाची अथवा अनुवादित चालेल. परंतु सद्भिरुचिहीन नसावी. सादर करताना कथा मुखोद्गतच हवी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. इच्छुकांना prabodhankridabhavan2014 @gmail.com या ई-मेलवर अर्ज करावे लागतील. स्पर्धेसाठी प्रवेश मूल्य 200 रुपये इतके आहे. हे प्रवेश मूल्य 7506760676 या मोबाईल क्रमांकावर अदा करावे लागेल. www.prabodhan.org या संकेतस्थळावर स्पर्धेची अधिक माहिती उपलब्ध आहे.