सोशल मीडियावर भडकावू रील्स बनविणाऱयांवर कारवाई, कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचा इशारा

भडकावू रील्स व्हायरल करून एकमेकांविरोधात खुन्नस देणाऱया टोळ्यांच्या संख्येत वाढ होत असून, खुनासारखे प्रकार समोर येऊ लागले आहेत. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने कोल्हापूर पोलीस ‘ऍक्शन मोड’वर आले आहेत. अशा प्रकारचे रील्स व्हायरल करणाऱयांना पोलिसी हिसका दाखवू, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला आहे. दरम्यान, कोल्हापुरात उद्यापासून (दि. 19) पोलीस शिपाईपदाच्या 154 आणि चालकपदाच्या 59 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिह्यात गेल्या चार महिन्यांत 24 खून झाल्याची नोंद पोलिसांत दाखल झाली आहे. यातील सर्वाधिक खुनाच्या घटना या पूर्ववैमनस्यातून आणि अनैतिक संबंधांतून घडल्या आहेत. जिह्यात गेल्या चार महिन्यांत टोळीयुद्धातून सहा खुनाच्या घटना घडल्या. दीड महिन्यापूर्वी गजबजलेल्या रंकाळा तलाव परिसरात एका गुंडाचा पाठलाग करून पाच ते सहाजणांनी भरदिवसा खून केल्याची घटना ताजी असतानाच गेल्या आठवडय़ात सुजल कांबळे याचाही अशाच प्रकारे खून झाला.

सोशल मीडियावर खुन्नस देणारे रील्स टाकल्यानेच विरोधी टोळीतील सात ते आठजणांनी तलवारीने वार करीत भरदिवसा हा खून केल्याचे समोर आले. गजबजलेल्या ठिकाणी खुनाच्या अशा घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सहज उपलब्ध होत असलेल्या नशेली पदार्थांमुळे तरुण हातात घातक शस्त्र्ाs घेत असल्याने टोळीयुद्ध भडकत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे रील्स पाहून, गांजा आणि नशेच्या पदार्थांचे सेवन करून हे धाडस केले जात असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक ऍक्शन घेण्याची भूमिका घेतली आहे.

कोल्हापुरात 154 शिपाईसह 59 चालकपदांसाठी भरती

n 19 ते 27 जून या कालावधीत येथील पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस परेड ग्राऊंडवर भरती प्रक्रिया होणार आहे. पोलीस शिपाईपदाच्या 154 जागांसाठी 6777, तर चालकपदाच्या 59 जागांसाठी 4668 अर्ज दाखल झाले आहेत. संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक व निःपक्षपातीपणे होणार आहे. पोलीसभरतीत शारीरिक चाचणीसाठी ‘आरएफआयडी’ या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर केला जाणार आहे. तसेच एकाच वेळी दोन ठिकाणी अर्ज दाखल केले