अभिनेत्री शोभिता धुलिपाल आणि साऊथचा प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. शोभिताच्या घरी लगीन घाई सुरु झाली असून त्याचे फोटो शोभिताने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
नागा चैतन्य याचे हे दुसरे लग्न आहे. पहिली पत्नी समांथासोबत घटस्फोट घेतल्यानंतर तो नैराश्यात गेला होता.
शोभिता धुलिपाल आणि नागा चैतन्य यांचा ऑगस्टमध्ये साखरपुडा झाला होता. ज्याचा फोटो पाहून प्रत्येकालाच धक्का बसला होता.
आता शोभिताच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून त्याचे फोटो शेअर केले आहेत. शिवाय त्यात लोकं तिला आशिर्वाद देताना दिसत आहेत.
तिने त्या फोटोंसोबत ‘गोधुमा रायी पसुपु अनुष्ठान आणि अखेर त्याची सुरुवात झाली आहे’ अशी फोटोओळही लिहीली आहे, ज्यामध्ये ती साऊथ इंडियन पारंपारिक पोशाखात दिसत आहे.
शोभिताच्या हातात हळदीही दिसत आहे आणि कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत ती विधी करताना दिसत आहे.
तिने गळ्यात सोन्याचे दागिने असून त्याने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.
या फोटोंमध्ये रेशमी साडीमध्ये दिसत आहे.
केसात चमेलीच्या गजरा माळलेला दिसत असून हातात हिरव्या बांगड्या दिसत आहेत.
शोभिताने इंस्टाग्रामवर या विधीचे 10 ते 12 फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या पोस्टवर एका युजरने लिहीले की, सदा सौभाग्यवती राहा, तर दुसऱ्या युजरने तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.