एकनाथ शिंदे आमच्या सोबत असताना भाजपचा अजेंडा राबवायचे, ते पळून गेले ते बरं झालं; संजय राऊत यांची टीका

काँग्रेसमध्ये भाजपचे काम करणारे लोक आहेत असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. एकनाथ शिंदे आमच्या सोबत असताना भाजपचा अजेंडा राबवायचे, ते पळून गेले ते बरं झालं अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना आणि 4 गद्दारांना सोन्याचे दिवस आलेले आहेत आज ते शिवसेनेमुळे आलेले आहेत. आमदारकी, खासदारकीच्या माध्यमातून जी संपत्ती जमा केली आहे, ही सगळी बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे आशिर्वाद आहेत. आणि त्यांचे सोन्याचे जे चमचे जे आहेत ते अजय अशर यांच्या ताब्यात असून अजय अशर दुबईला पळालेले आहेत असे संजय राऊत यांनी सांगितले.

लाडक्या बहीणींची वारंवार फसवणूक सुरू आहे. 1500 रुपये देऊन मतं विकत घेतली, आणि आश्वासन दिलं की 2100 रुपये देऊ. आता बहीणींनी मतं दिली आणि सरकारकडे पैसे नाहीत. वृद्ध कलाकारांचं मानधन थकवलंय. हे काय सरकारच्या खिशातले पैसे नााहियेत. हे जनतेच्या करातले पैसे आहेत. तुम्ही त्याचं राजकारण केलं. अर्थात राज्याची जनता हे उघड्या डोळ्यांनी पाहितेय. जो पर्यंत जनता बंड करत नाही, तोपर्यंत ही जनतेची ही फसवणूक सुरूच राहिल.

भाजपची बी टीम फक्त काँग्रेसमध्ये नाहिये. इतर पक्षात राहून जे लोक भाजपसाठी काम करतात ते लोक नमकहराम आहेत. आमच्यासोबत एकनाथ शिंदे होते आणि दोन वर्ष भाजपचा अजेंडा राबवत होते. शिंदे पळून गेले बरं झालं, आम्ही मोकळे झालो. आपल्या देशात काही लोक असे आहेत ते दुसऱ्या देशासाठी काम करतात. जसे संघाचे प्रदीप कुरूलकर. DRDO मध्ये बसून ते पाकिस्तानसाठी काम करत होते असेही संजय राऊत म्हणाले.