![neehar (71)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-71-696x447.jpg)
पाण्याचा थेंबही नसलेली पाणपोई, आसनव्यवस्थेच्या निखळलेल्या फरशा, राडारोडा आणि कचऱ्याच्या ढिगांनी माखलेलं आवार, फुटलेलं ड्रेनेज, तुटलेल्या होर्डिंगचा सांगाडा, अन् पाहावे तिकडे अस्वच्छताच अस्वच्छता ! ही दैना आहे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकाची. शहराचं नाक असलेल्या या स्थानकात रोज हजारो प्रवाशांची ये-जा असते; पण ती नाक धरूनच ! आवारात बिनदिक्कतपणे घुसखोरी करणाऱ्या रिक्षाचालकांचा प्रवाशांना सोसावा लागणारा उद्दामपणा न्याराच ! ही स्थिती बदलून आम्हाला सोयीसुविधा मिळणार का? असा सवाल आता प्रवासी करत आहेत. (फोटो- चंद्रकांत पालकर)
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-72.jpg)
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-73.jpg)
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-75.jpg)
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-76.jpg)