पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱयात धक्कादायक प्रकार घडला आहे. मोदींच्या ताफ्यातील कारवर चप्पलफेक झाली असून पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चूक आज व्हायरल व्हीडियोमुळे समोर आली. दरम्यान, मोदींविरोधातील नाराजी वाराणसीकरांनी व्यक्त केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहेत. वाराणसी दौऱयावर आलेल्या मोदींच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ कारवर स्लीपर फेकण्यात आली. सुरक्षा रक्षकाने ताफा पुढे सरकत असतानाच ही स्लीपर हाताने काढून बाजूला केली. यावेळी मोदी… मोदी… अशी घोषणाबाजीही सुरू होती. याचदरम्यान गर्दीतच मोदींच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याबद्दल मोठय़ा आवाजात चर्चा सुरु झाली. सुरक्षा रक्षक चप्पल बाजूला करतानाचे दृश्य पॅमेऱयात पैद झाले आहे.