यंदा धोssधो… कोसळणार!

यावर्षी देशात सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडणार असल्याची सुखद बातमी ‘स्कायमेट’ने दिली आहे. मान्सूनचा हंगामही सामान्य राहील, असेही स्कायमेटने जाहीर केले आहे. जून ते सप्टेंबरपासून हा पाऊस पडेल, असेही स्कायमेटने म्हटले आहे. तर जून ते सप्टेंबर या दीर्घकालीन कालावधीत 868.6 मिमी इतका पाऊस पडणार आहे. शिवाय ‘एलनिनो’चा प्रभाव कमी असल्याने पाऊस पडण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्कायमेटचे जतिन सिंह यांनी सांगितले.