स्टॅंडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली. अभिनेता वीर पाहारिया याच्यावर विनोद केल्यामुळे त्याला ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर वीर पाहारियाच्या टीमने मुंबईत ऑलनाईन पद्धतीने पोलिसात तक्रार केली आहे. या घटनेनंतर आता वीर पाहारियानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
स्टॅन्डअप कॉमेडीयन प्रणित मोरे याच्या म्हणण्यानुसार 2 फेब्रुवारी रोजी सोलापुरातल्या एका हॉटेलमध्ये प्रणीतचा स्टॅन्डअप शो झाला. या शो नंतर 11-12 लोकांच्या एक गट फोटोसाठी विनंती करतं पुढे आला आणि त्यांनी प्रणितला मारहाण केली आणि धमकी दिली. तन्वीर शेख नावाचा व्यक्ती हा ग्रुपचा लीडर होता. प्रणित याने वीर पाहारियाच्या बाबतीत केलेल्या विनोदावरून मारहाण केल्याचे त्याने म्हटले. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेतली नाही, असा दावा प्रणितने आपल्या पोस्टमध्ये केला. दरम्यान, प्रणितच्या या पोस्टनंतर वीर पाहारिया याने देखील इमस्टाग्रामवरून प्रतिक्रिया दिलीय. त्यामध्ये त्याने “प्रणित सोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मला धक्का बसला असून या प्रकरणाचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. तरी घडलेल्या प्रकारबद्दल मी प्रणित आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागतो. आरोपींवर कारवाई होईल या बाबतीत मी स्वतः लक्ष घालेन”.
View this post on Instagram