तामिळनाडूमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; 6 जणांचा मृत्यू, सुमारे 30 जण जखमी

तामिळनाडूमध्ये विरुधूनगर जिल्ह्यात शनिवारी एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 जण जखमी झाले आहेत. घडली. फटाके बनवण्यासाठी रसायनांचं मिश्रण करत असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या भीषण स्फोटामुळे कारखान्याचा एक भाग पूर्णपणे नष्ट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

फटाके बनवण्यासाठी रसायनांचं मिश्रण करत असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटामुळे कारखान्याचा एक भाग पूर्णपणे कोसळला आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा बलांना तैनात केले आहे. तसेच घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.