जम्मू-कश्मीरमधील राजौरी येथे आज एलओसीजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात लष्कराचे सहा जवान जखमी झाले. भवानी सेक्टरमधील मकरी भागात हा स्फोट झाला. गोरखा रायफल्सच्या सैनिकांची तुकडी खंभा किल्ल्याजवळ सकाळी पावणेअकराच्या सुमारास गस्त घालत असताना एका जवानाचा चुकून भूसुरुंगावर पाय पडला. त्यामुळे हा स्फोट झाला. नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी रोखण्यासाठी भूसुरुंग पेरण्यात आले आहेत.
या स्फोटात जखमी झालेल्या जवानांना राजौरी येथील 150 जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटात हवालदार एम. गुरुंग, हवालदार जे थाप्पा, हवालदार जंग बहादूर राणा, हवालदार आर राणा, हवालदार पी. बद्र राणा, हवालदार व्ही. गुरुंग हे जखमी झाले.
गेल्या वर्षी घडल्या होत्या दोन घटना
n 9 डिसेंबर 2024 रोजी जम्मूच्या पूंछमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात एका जवानाचा मृत्यू झाला होता. पूंछमधील ठाणेदार टेकरी येथे गस्त घालत असताना झालेल्या या स्फोटात हवालदार व्ही. सुब्बया वारीपुंटा यांचा मृत्यू झाला होता.
n ऑक्टोबर 2024मध्ये कुपवाडा येथे झालेल्या भूसुरुंग स्फोटात लष्कराचे दोन जवान जखमी झाले होते. नियंत्रण रेषेवर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास गस्ती वेळी हा स्फोट झाला होता.