विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत कुठेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी पोलिस अक्षरशः डोळ्यांत तेल घालून खडा पहारा देत आहेत. अशातच विक्रोळी येथे एका छोटय़ा टेम्पोत साडेसहा टन वजनाच्या विटा सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना एका पॅश व्हॅनमध्ये तब्बल साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या चांदीच्या विटांची किंमत करोडोंच्या घरात आहे. या विटा मुलुंडमधील एका गोदामात ठेवण्यासाठी ब्रिंक्स कंपनीच्या गाडीतून नेल्या जात होत्या. निवडणूक आयोगाने पकडलेल्या या विटा अधिकृत असल्याचे सांगितले जात आहे. आता निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान राज्यात नाक्यानाक्यांवर वाहनांची कसुन तपासणी केली जात आहे. सगळीकडे चोख पोलीस बंदोबस्त आहे.