घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी 3200 पानांचे आरोपपत्र

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी गुन्हे शाखेच्या एसआयटीने आज 3200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. 50 हून अधिक साक्षीदार असून पोलिसांनी त्यांचे जबाब आरोपपत्रात जोडले आहेत. या गुह्याचा तपास किचकट असून तो करणे बाकी आहे. सीआरपीसी कलम 173 (अ) नुसार तपास पुढे चालू राहणार आहे.

मे महिन्यात आलेल्या वादळी पावसाने छेडानगर येथील होर्डिंग पेट्रोल पंपावर पडले होते. होर्डिंग दुर्घटनेत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्याचा तपास क्राइम ब्रँच युनिट 7 कडे सोपवला.

गुन्हा दाखल झाल्यावर इगो मीडियाचा संचालक भावेश भिंडे हा पळून गेला होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती. भिंडेच्या अटकेनंतर दुर्घटनाग्रस्त हार्ंडगला फिटनेस प्रमाणपत्र देणाऱया मनोज संघूला देखील अटक केली. या गुह्याचे स्वरूप पाहता एसआयटी स्थापन केली. एसआयटीने तपास हाती घेताच इगो मीडियाच्या जान्हवी मराठे आणि पुंभार याला गोव्यातून अटक केली होती. या गुह्यात पोलिसांनी रेल्वेच्या अधिकाऱयाचा जबाब देखील नोंदवून घेतला होता. तसेच व्हीजेटीआयच्या पथकाने देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. त्याचा अहवाल पोलिसांना सादर केला होता. होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी 57 व्या दिवशीच आरोपपत्र न्यायालयात सादर केले. एकूण 3200 पानांचे हे आरोपपत्र आहे. त्यात पोलिसांनी 50 हून अधिक जणांचा जबाब नोंदवला आहे. आरोपपत्रात पोलिसांनी व्हीजेटीआयचा अहवाल देखील जोडला आहे.