दिवाळीच्या मुहूर्तावर ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूलभुलैया 3’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. दोघांची बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर होतेय. त्यात ‘सिंघम अगेन’ने जोरदार मुसंडी मारली. अजय देवगणच्या या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत 100 कोटी पार केल्याचे समजतेय.
‘सिंघम अगेन’ने पहिल्या दिवशी हिंदुस्थानात 43.50 कोटींचा गल्ला केला, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 41.50 कोटी रुपये कलेक्शन केल्याचे समजतेय. दोन दिवसांत जगभरात हा चित्रपट पाहिला गेला. त्यामुळे या चित्रपटाचा गल्ला 100 कोटींच्या वर गेलाय. सोमवारपर्यंत हा आकडा 200 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, टाइगर श्रॉफ, करिना कपूर, अर्जुन कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. शिवाय सलमान खान चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसलाय.
कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलैया 3’ ने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करत 35.50 कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी 36 ते 37 कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कची ही प्राथमिक आकडेवारी आहे.
दिवाळी जोरदार….
अभिनेता अजय देवगणचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘सिंघम अगेन’ हा दिवाळी धमाका करत मोठ्या पडद्यावर शुक्रवारी प्रदर्शित झाला. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मल्टिस्टारर चित्रपटाची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली. ‘सिंघम अगेन’ने पहिल्याच दिवशीच्या कमाईत कार्तिक आर्यनच्या हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूलभुलैया 3’ ला मागे टाकले. 1 नोव्हेंबर रोजी चित्रपटाने 44 कोटींची कमाई केली. हे प्राथमिक आकडे आहेत. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, शनिवारी ‘सिंघम अगेन’ने 42.2 कोटी रुपये कमावले.