
बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिचे ‘एक्स’ अकाऊंट हॅक झाले आहे. अकाऊंट हॅक झाल्याची माहिती श्रेयाने स्वतः इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. माझे ‘एक्स’ अकाऊंट 13 फेब्रुवारीपासून हॅक झाले आहे. मी एक्स टीमशी संपर्क करण्यासाठी खूप प्रयत्न केला, परंतु काही ऑटो जनरेटेड मेसेजशिवाय कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मी माझे अकाऊंट डिलीटसुद्धा करू शकत नाही. कारण मी लॉगिन करू शकत नाही. माझ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असे श्रेयाने म्हटले आहे.