‘सवार लूं…’ फेम गायिका मोनाली ठाकूरची तब्येत बिघडली, लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान श्वास घ्यायला त्रास

‘सवार लूं…, मोह मोह के धागे’ फेम गायिका मोनाली ठाकूर हिची लाईव्ह कॉन्सर्टमध्येच तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोनालीवर दिनहाटा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिनहाटा मोहत्सवात परफॉर्मन्स सुरू असतानाच मोनालीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर तिने परफॉर्मन्स तात्काळ थांबवला. मोनालीला तातडीने दिनहाटा सब-डिस्ट्रीक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मोनालीला कूचबिहारच्या एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.