पॉवरफुल पासपोर्ट यादीत सिंगापूर टॉप; हिंदुस्थान 80 व्या स्थानावर घसरले

जगातील सर्वात जास्त पॉवरफुल पासपोर्टची यादी जाहीर करण्यात आली असून सिंगापूरने अव्वल स्थान पटकावले असून जपानला दुसरे स्थान मिळाले आहे, तर हिंदुस्थानचे स्थान घसरले असून ते 80 व्या स्थानावर गेले आहे. जगभरातील पासपोर्टची स्थिती सांगण्याचा अहवाल इंडेक्स हेन्ले अॅण्ड पार्टनर्सने जारी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील 199 पासपोर्टची लिस्ट बनवण्यात आली असून कोणत्या देशात विनाव्हिसा एण्ट्री मिळते, या आधारावर देशाला रँक देण्यात आली आहे. सिंगापूरचा पासपोर्ट एपूण 227 पैकी 193 देशांत जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या जपान आणि दक्षिण कोरियाचा पासपोर्ट असल्यास 190 देशांत जाण्यासाठी व्हिसाची गरज नसते.

चीनयूएईची कमाल

गेल्या दशकभरात सर्वात जास्त पॉवरफुल बनलेल्या देशांमध्ये यूएई पहिला आणि एकमेव देश आहे. 2015 पासून 72 अतिरिक्त देशांत व्हिसा विना फ्री एण्ट्री मिळवली आहे. यूएईने 32 व्या स्थानावरून थेट आता दहाव्या स्थानावर उडी घेतली आहे. यूएईचा पासपोर्ट असल्यास जगातील 198 देशांत व्हिसा विना एण्ट्री मिळते. यूएईनंतर चीननेसुद्धा जबरदस्त झेप घेतली आहे. 2015 मध्ये 94 व्या स्थानावरून 2025 मध्ये 60 व्या स्थानावर झेप घेतली आहे. वर्षभरात चीनने आणखी 29 देशांत फ्री एण्ट्री मिळवली आहे. तिसऱ्या स्थानावर एपूण सात देश आहेत. यामध्ये डेन्मार्प, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, आयरलँड, इटली आणि स्पेन या देशांचा समावेश आहे.

 जगातील पॉवरफुल टॉप देश

  • सिंगापूर     ः 193 देशांत एण्ट्री
  • जपान ः 190 देशांत एण्ट्री
  • दक्षिण कोरिया ः 190 देशांत एण्ट्री
  • डेन्मार्प      ः 190 देशांत एण्ट्री
  • फिनलँड     ः 189 देशांत एण्ट्री
  • फ्रान्स ः 189 देशांत एण्ट्री
  • जर्मनी       ः 189 देशांत एण्ट्री
  • आयर्लंड     ः 189 देशात एन्ट्री
  • इटली ः 189 देशांत एण्ट्री
  • स्पेन ः 189 देशांत एण्ट्री
  • ऑस्ट्रेया     ः 188 देशांत एण्ट्री

बेल्जियम   ः 188 देशांत एण्ट्री

लक्झम्बर्ग ः 188 देशांत एण्ट्री

नेदरलँड्स   ः 188 देशांत एण्ट्री