हेन्ली अँड पार्टनर्स या संस्थेने जगातील शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर केली. यात सिंगापूरचा पासपोर्ट हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरलाय. ज्याला 195 देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री आहे. जपानसोबतच फ्रान्स, इटली, जर्मनी आणि स्पेन दुसऱया क्रमांकावर असून त्यांच्या पासपोर्टवर 192 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येतो. हिंदुस्थानने 82 वे स्थान पटकावले असून हिंदुस्थानी 58 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकतात.
एखाद्या देशाचा पासपोर्टधारक व्हिसाशिवाय किती देशांमध्ये जाऊ शकतो, या आधारावर ही क्रमवारी ठरवली जाते. ऑस्ट्रिया, फिनलंड, आयर्लंड, लक्झमबर्ग, नेदरलँड, दक्षिण कोरिया आणि स्वीडन हे 191 देशांमध्ये मोफत व्हिसा प्रवेशासह तिसऱया स्थानावर आहेत. अफगाणिस्तानचा पासपोर्ट 103 व्या क्रमांकासह जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे. तर पाकिस्तानचा पासपोर्ट हा जगातील चौथ्या क्रमांकाचा कमकुवत पासपोर्ट ठरला आहे.