मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळल्याने महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. छत्रपती शिवरायांचा दुर्घटनाग्रस्त पुतळा पाहण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे मालवण येथे गेले असताना नारायण राणे आणि त्यांच्या गुंडांनी तिथे उन्माद माजवला, स्थानिक शिवसैनिकांना धमक्या दिल्या, पोलिसांशी अरेरावी केली. या विरोधात गुरुवारी पुणे शहरात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राणेला जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘चाराणे, बाराणे अटक करा राणे’ घोषणा देत शिवसैनिकांनी राणे पिता-पुत्रांना चपलांचा हार घातला व लाथा आणि जेडे मारले.