Sindhudurg News – ‘रेझिंग डे’ सप्ताह, पोलीस दलाची व त्यांच्या कामकाजाची जनजागृती व्हावी म्हणून तीन दिवस प्रदर्शन

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस दलाची व पोलिसांच्या कामकाजाची नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने तीन दिवस प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. “रेझिंग डे” सप्ताहाच्या अनुषंगाने पोलिसांची नागरिकांसाठी ही विशेष मोहिम असणार आहे. या तीन दिवसांमध्ये पोलीस दलाची रचना व कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

सदर प्रदर्शन 6 जानेवारी ते 8 जानेवारी असे तीन दिवस असणार आहे. 6 जानेवारीला कणकवली एस.टी.बस स्टँड जवळ, 7 जानेवारीला कुडाळ पोलीस ठाणे समोरील पटांगण आणि 8 जानेवारी रोजी जगन्नाथ भोसले उद्यान सावंतवाडी येथे प्रदर्शन भरवले जाणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते सायंकाली 7 अशी असणार आहे. या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये नागरिकांना श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सायबर गुन्हे सुरक्षा, सागरी सुरक्षा, अग्निशस्त्रे, फॉरेन्सीक युनिट, महिला सहाय्य, वाहतूक नियमन व नियंत्रण, पोलीस दलाची रचना व कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला नागरीक व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने भेट द्याव व प्रदर्शनाची माहिती घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.