दिग्वेश राठीवरील दंडात्मक कारवाई चुकीची – सायमन डूल

लखनौ सुपर जायंट्सचा युवा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठी हा यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत आपल्या अनोख्या ‘नोटबुक सेलिब्रेशन’मुळे चांगलाच चर्चेत आलाय. या सेलिब्रेशन शैलीमुळे दिग्वेशवर दोनदा दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व जिओहॉटस्टारचे आयपीएल तज्ञ सायमन डूल यांनी बीसीसीआयच्या या निर्णयावर टिका केली. सायमन डूल यांनी पंचांमधील भेदभावाचा प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले, ‘नव्या दमाच्या दिग्वेश राठीने केलेले ‘नोटबुक सेलिब्रेशन’ अक्षेपार्ह नाही. हिंदुस्थानी संघातील काही वरिष्ठ खेळाडू, तर यापेक्षाही अधिक आक्रमक सेलिब्रेशन करतात. मात्र, त्यांच्यावर ‘बीसीसीआय’कडून दंडात्मक कारवाई होत नाही. हा पक्षपात आहे.