तेरा लाखांची चांदीची बिस्किटे चोरीला

व्यापाऱ्याच्या घरातून 13 लाखांची चांदीची बिस्किटे चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी नोकराविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे कांदिवली येथे राहतात. त्या इमारतीत त्याचे नातेवाईक राहतात. त्याच्याकडे 32 वर्षांपासून एक नोकर कामाला होता. त्याच्या पतीची आत्या आजारी असल्याने तिच्याकडे चांदीचे दागिने सम प्रमाणात वाटले होते. चांदीचे दागिने त्याने कपाटात सुरक्षित ठेवले होते. त्याच्या फ्लॅटच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. तेव्हा कामगार येत असल्याने त्याची जबाबदारी एका नोकराकडे सोपवली होती. फेब्रुवारी महिन्यात तो नोकर अचानक गायब झाला. तो परत आला नाही. त्यामुळे तक्रारदार याने तक्रार दाखल केली. या घटनेनंतर त्याने कपाटातील दागिन्यांची तपासणी केली असता, चांदीची बिस्किट मिळून आली नव्हती. घडल्याप्रकरणी त्याने कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.