नववर्षाच्या अनुषंगाने सिद्धिविनायक आणि बाबुलनाथ येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे मोबाईल चोरटय़ाने लांबवल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटनेत एकूण 5 महागडे मोबाईल चोरी झाले आहेत. या प्रकरणी गावदेवी आणि दादर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. कल्याण येथे रहिवाशी तक्रारदार हे शिपिंग आणि लॉजिस्टिकमध्ये काम करतात. नववर्षाच्या अनुषंगाने ते मैत्रिणीसोबत बुधवारी बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या मेन गेटच्या रांगेतून जाताना त्यांचा मोबाईल चोरीला गेला. तसेच मालाड येथील व्यावसायिकाचाही मोबाईल चोरटय़ाने लांबवला. तसेच प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात घडली. वांद्रे येथे राहणारा युवकाचा मोबाईल चोरटय़ाने खिशातून लंपास केला. मंदिरातील गर्दीचा चोरटय़ाने फायदा उठवला.