सिद्धार्थ जाधवचे आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण

सिद्धार्थ जाधवला अभिनय क्षेत्रात नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिद्धार्थने निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धार्थने आपल्या आई-वडिलांच्या नावाने स्वतःची नाटय़निर्मिती संस्था सुरू केली आहे. त्याच्या नाटय़निर्मिती संस्थेचे नाव ‘ताराराम प्रॉडक्शन्स’ असे आहे. सिद्धार्थच्या आईचे नाव तारा आणि वडिलांचे नाव रामचंद्र यावरून ताराराम प्रॉडक्शन्स हे नाव ठेवण्यात आले आहे.