
बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन आपल्या चिडचिड्या स्वभावामुळे व परखड वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये त्या नेहमीच फोटोग्राफर किंवा मीडियावर चिडचिड करताना दिसतात, पण जया बच्चन अशा चिडचिड का करतात? त्यांच्या या रागामागील रहस्य त्यांची मुलगी श्वेता नंदाने उलगडले आहे.
नुकतीच श्वेता नंदा आणि अभिषेक बच्चन ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सहभागी झाले होते. या वेळी श्वेता नंदा यांनी सांगितले की, आईला क्लॉस्ट्रोफोबिया नावाचा आजार आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे, ज्यामुळे गर्दी पाहून अचानक व्यक्ती अस्वस्थ होते. बऱ्याच प्रसंगी असेही घडते की, त्यांना राग येतो किंवा त्या बेशुद्ध पडू शकतात. त्या खूप गर्दीच्या ठिकाणी असतात तेव्हा असे वागतात.
पुढे श्वेता नंदा यांनी सांगितले की, आईला कोणी गर्दीच्या ठिकाणी घेऊन गेले तर तिला ते अजिबात आवडत नाही. कॅमेराचा फ्लॅश तिच्या डोळ्यांवर पडतो, त्या वेळी ती अस्वस्थ होते. ती कुठे बाहेर गेली तरी मीडिया तिच्या मागे लागतो हेदेखील तिला अजिबात आवडत नाही.