Summer Juices- ऊसाचा की बेलफळाचा या उन्हाळ्यात तुम्ही कोणता रस पिणार?

उन्हाळा आल्यावर सहाजिकच घामाच्या धारा लागणारच. पण या घामाच्या धारांमधून मुक्ती मिळवण्यासाठी शरीरामध्ये आतही थंडावा यायला हवा. अशावेळी आपण शरीराला थंड ठेवणे आणि योग्य हायड्रेशन राखणे खूप महत्वाचे आहे. म्हणून या ऋतूत लोक थंड आणि पौष्टिक भारतीय पेयांकडे वळतात. उन्हाळ्यात उसाचा रस आणि बेल फळाचा रस ही दोन पारंपारिक पेय आपल्याकडे मोठ्या प्रमाणात विकायला असतात. ही दोन्ही पेयं आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत आणि शरीराला थंडावा देणारे आहेत.

पण आता प्रश्न असा उद्भवतो की उन्हाळ्यात या दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय जास्त फायदेशीर आहे? दिवसभराचा थकवा आणि उष्माघात दूर करण्यासाठी उसाचा रस चांगला आहे की पोट शांत करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी बेल फळाचा रस अधिक प्रभावी आहे? जाणून घ्या  सविस्तर

उसाचा रस

 

उसाच्या रसात नैसर्गिक साखर असते, जी थकलेल्या शरीराला त्वरित ऊर्जा देते.

 

उन्हाळ्यात उसाचा रस शरीराला थंडावा देतो आणि उष्माघातापासून वाचवतो. हे यकृतासाठी देखील फायदेशीर आहे.

 

कावीळमध्ये हे विशेषतः फायदेशीर मानले जाते. तुम्हाला अपचन किंवा छातीत जळजळ यासारख्या पोटाशी संबंधित समस्या असतील तर त्यातही उसाचा रस फायदेशीर आहे.

 

उसामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते.

 

बेल फळाचा रस

 

बेल फळाचा रस आतडे स्वच्छ करतो आणि पोटातील उष्णता, गॅस, बद्धकोष्ठता आणि अतिसार यासारख्या समस्यांपासून देखील आराम देतो.

 

बेलफळाचा ज्यूस हा शरीराला आतून थंड ठेवतो. तसेच बेलफळ ज्यूस हा विशेषतः पोटासाठी खूप फायदेशीर आहे. ते प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि ते बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यास मदत करते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)