
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळीत नाबाद 101 आणि 46 धावांचड खेळी करणाऱ्या शुभमन गिलने (791 गुण) एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे. तसेच बाबर आझमही दुसऱ्या स्थानी कायम आहे. तसेच गोलंदाजीत श्रीलंकेचा महीश तीक्षणाचेही अव्वल स्थान स्थिर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अफगाणिस्तानच्या अझमतुल्लाह ओमरझाईने आपल्याच देशाच्या मोहम्मद नबीला मागे टाकत प्रथमच आयसीसीत अष्टपैलूंचे अव्वल स्थान पटकावले. सध्या क्रिकेट विश्वात वन डे क्रिकेटमधील आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सुरू असल्यामुळे केवळ याच क्रिकेटमधील खेळाडूंच्या क्रमवारीत खूप बदल झाले आहेत, मात्र तितके बदल अन्य खेळात दिसत नाहीत. अष्टपैलूंच्या यादीत रवींद्र जाडेजा नवव्या स्थानावर स्थिर आहे. आयसीसीच्या कसोटी आणि टी-20 क्रिकेटचीही क्रमवारी जाहीर झाली असून ज्यो रुट आणि ट्रव्हिस हेडने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.