
भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध खेळाडू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावेळी सारा आणि शुभमन गिल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्याच्या घडीला सारा आणि शुभमन यांची ब्रेकअप चर्चा सोशल मीडियापासून ते गॉसिप टाऊनपर्यंत रंगू लागली आहे. दोघांचे ब्रेकअप झाले असून, ते वेगळे झाले आहेत याचा सबळ पुरावा म्हणजे या दोघांची इन्स्टाग्राम अकाऊंट हे आहे. या दोघांनीही एकमेकांना अनफाॅलो केल्यामुळे, या ब्रेकअपच्या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झालेले आहे.
सचिनची मुलगी सारा आणि शुभमन यांच्या नात्याची चर्चा ही क्रिकेटप्रेमीपुरती मर्यादित नव्हती. या दोघांच्या नात्यांच्या चर्चा काॅलेजकट्ट्यापासून ते क्रिकेट ग्राऊंडपर्यंत ऐकायला मिळत होती. दोघेही लग्न करणार अशा बातम्याही अनेकदा कानावर आल्या होत्या. परंतु हे असे असताना मात्र या दोघांच्या ब्रेकअपची बातमी त्यांच्या फॅन्सच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. शुभमन गिलच्या फॅन्समध्ये तरुणींचा भरणा हा सर्वात जास्त आहे. त्यामुळे सध्या या बातमीने अनेकींना तर नव्याने उभारी मिळाली आहे.
सारा आणि शुभमन यांच्या नात्याबद्दल गेले कित्येक दिवस चर्चा रंगत होती. शुभमन गिल मैदानात असताना त्याला सारावरून अनेकांनी आवाजही दिलेला आहे. शुभमन दिसताच, हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो.. असे कित्येकदा ऐकायलाही मिळालेली आहे. या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली नाही. परंतु दोघेही अनेकदा विविध ठिकाणी एकत्र दिसले आहेत. यामुळे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले होते की, ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. आता अचानक दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत.