नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची व संत्रा फळाची आकर्षक सजावट केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. श्री विठ्ठल गाभारा, श्री रुक्मिणी गाभारा व श्री संत नामदेव पायरी येथे झेंडू, शेवंती, तोरण, कामिनी इत्यादी 300 किलो फुलांचा व 5 हजार नग संत्रा फळांचा वापर करून मनमोहक व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सदरची सजावट विठ्ठल भक्त प्रदीपसिंह ठाकुर पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली असून, सजावटीचे काम श्री साई डेकोरेटर्स शिंदे ब्रदर्स पंढरपूर यांनी केले आहे. त्यासाठी सुमारे 20 कामगारांनी परिश्रम घेतले.