
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या विश्वस्तांची उद्या, रविवारी बैठक होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली मणिराम छावनी मंदिरात ही बैठक पार पडेल. ट्रस्टचे विविध पदाधिकारी, केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि जिल्हा अधिकारी बैठकीला उपस्थित असतील. राम मंदिर ट्रस्टची शेवटची बैठक नोव्हेंबरमध्ये झाली होती. तेव्हा मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्या आणि खर्चावर चर्चा झाली होती. मंदिराचे बांधकाम, निधी, सार्वजनिक सुविधा आणि खर्च यावर बैठकीत चर्चा होईल.